अहीर गवली समाज अहिरात 

LightBlog

अहीर वर वधू परिचय मच

..

Tuesday, September 3, 2024

गडचांदूर 📍दौरा - हंसराज भैय्या अहीर इतर मागासवर्गीय आयोगाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. हंसराजजी अहिर यांच्या अध्यक्षतेखाली तथा राजुरा विधानसभा क्षेत्रातील लोकाभिमुख नेते माजी आमदार अँड संजयजी धोटे यांच्या


📍गडचांदूर 📍दौरा - हंसराज भैय्या  अहीर 
इतर मागासवर्गीय आयोगाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. हंसराजजी अहिर यांच्या अध्यक्षतेखाली तथा राजुरा विधानसभा क्षेत्रातील लोकाभिमुख नेते माजी आमदार अँड संजयजी धोटे यांच्या कार्यक्रमाचे उद्घाटक तथा प्रदेश कार्यकारिणी सदस्य खुशालजी बोंडे यांच्या उपस्थितीत आज मित्रागंण बहुउद्देशिय युवा विकास मंचच्या माध्यमातून आज बचतगट महिला रक्षाबंधन कार्यक्रम सोहळा गडचांदूर येथे संपन्न.

''*सर्व समाज घटकांच्या उन्नतीसाठी कटिबद्ध सर्वागीण विकास हेच ध्येय*"
-  मा. हंसराजजी अहिर राष्ट्रीय अध्यक्ष ओबीसी आयोग

लोकसभा विस्तारक तथा महाराष्ट्र भाजपा प्रदेश कार्यकारणी सदस्य मा. श्री. खुशालजी बोंडे यांच्या वाढदिवसानिमित्त  तसेच मित्रागंण बहुउद्देशिय युवा विकास मंच या सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष तथा भटक्या विभक्त आघाडीचे जिल्हाध्यक्ष श्री. हितेश चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्ताने लाभार्थ्यांना महिला बचत गटाच्या लाभार्थ्यांना सिलाई मशिनसह अन्य वस्तूंचे वाटप करण्यात आले.

आज गडचांदुर शहरातील अग्रणी असलेल्या मित्रागंण संस्थेच्या माध्यमातून लक्ष्मी टॉकीज येथे मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना तथा राखी पौर्णिमेच्या औचित्यपूर्ण माध्यमातून बचतगट महिला मेळावा व रक्षाबंधन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी कोरपणा तालुक्यातील गडचादुर शहरातील मान्यवर, पदाधिकारी, कार्यकर्ते, माताभगिनी आदिची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.

No comments:

Post a Comment

केंद्रीय राज्यमंत्री ना.रावसाहेब दानवे यांच्या हस्ते अध्यक्ष ब्रम्हानंद जांगडे व अहिर गवळी समाज नव

LightBlog