एक सरळ मार्गी व्यक्तीमत्व स्व. सोनूलाल भुरेवाल
समाजात वावरताना आपण काही व्यक्ती अशा पाहतो की, ज्यांच्या अंगी असणारे गुण त्यांच्या साध्याभोळ्या राहणीने, विचारसणीने, नमस्यभवाने, लाजरेपणामुळे इतरांच्या लक्षात येत नाहीत.
स्व. श्री. सोनुलाल दादाराम भुरेवाल (सोन्या पहेलवान) हे असेच एक सरळमार्गी. कुणाच्याही अध्यातमध्यात नसणारे व्यक्तीमत्व होते. श्री. सोनुलाल दादाराम भुरेवाल यांचा जन्म १५ जून १९२७ रोजी जालना शहरात एका सधन अहिर गवळी कुटूंबात झाला. त्यांचे बालपण अंत्यत सुखात गेले. त्यांचे धोरण पैलवानी. त्यांचे सारे तालमीचा शौक असलेले.
त्यांचे दोन चुलत बंधूपैकी कुंवर पहेलवान गाजलेले व नावाजलेले मल्ल होते एक बंधू सुखीराम हे १९५६ पर्यंत अमीन होते. त्यांचे दोन बंधू लालजी व रामचंद्र आर्य हे आर्य समाजाच्या हैद्राबाद मुक्ती स्वातंत्र्यसैनिक म्हणून गौरविले तर तुलजाराम वस्ताद हे पठडीतील भजन सम्राट.श्री. सोन्या पहेलवान खुल्या कुस्त्यामध्ये फड गाजवीत. एक-एक टप्पा पादक्रांत करीत मराठवाड्यातील जवळजवळ त्यांच्या समकालीन पहेलवानांना नामोहरण एक प्रथितयश व अजेय पहेलवान म्हणून त्याकाळी नावारूपास आले. त्यांचे समवयीन असलेल्या व्यक्ती अजूनही सोन्य पहेलवानचे नाव निघाले तर सांगतात की पैलवान मुर्ती लहान पण किर्ती महान. या म्हणीला सार्थ करीत भल्या भल्यांशी टक्कर देत असे. त्यात मनमाडचे आबाजी पहेलवानासोबत झालेल्या त्यांच्या कुस्तीचे आवर्जुन उल्लेख होत. म्हणतात की हा पहेलवान शरीराने, अंगकाठीने व सरस असूनही सोन्या पहेलवान यांनी त्या आबाजी पहेलवानाची चांगली दमछाक करून सळो की पळो करून सोडले. शेवटी त्या पहेलवानानेच सोन्या पहेलवानाची मुक्तकंठाने प्रशंसा केली. म्हणतात की, त्या घडीला सोन्या पहेलवानाची तयारी इतकी जबरदस्त होती की, कुस्तीनंतर त्यांचे लंगोटला ब्लेड व कात्रीने कापून काढावे लागले होते.
कुठल्या प्रकारचे कुस्तीतील शास्त्रशुद्ध ज्ञान नसतांनाही आपल्या 'ढाक' या वैशिष्टपूर्ण डावाने ते प्रतिस्पर्ध्यावर मात करीत असे. डावाची आकर्षक व जोमदार सुरुवात, युक्त्या प्रत्युयुक्त्यांचा मधला डाव आणि अचूक, विचारपूर्वक शेवटचे पर्व हे त्यांच्या खेळाचे वैशिष्टय होते. अतिशय स्थिर चित्ताने ते डाव खेळत असे. तद्नंतर काही काळ रूपचंद वस्ताद व्यायामशाळेत अनेक मल्ल, कुस्तीगीर व पैलवानांना डावपेच, कसब व मार्गदर्शनही केले. जालना येथील कुस्तीचा इतिहास हा सोन्या पहेलवानाच्या उल्लेखाशिवाय अपूर्ण असे. आजही जुन्या पिढीतील लोक आवर्जुन सांगतात या कुस्तीगीराचे अंततः शेवटचे दिवस फार हालाखीचे अत्यंत गरीबीचे गेले. सरते शेवटी त्यांनी आपल्या मुलांना व्यायामाबरोबरच शिक्षण घेण्यासाठी सांगितले. फक्त व्यायाम व कुस्ती क्षेत्रात न राहता समाजकारण, शिक्षण व अर्थ ह्या तिन्हीची सांगड घालण्यासाठी कुस्तीगिराने इहलोकांची यात्रा संपविली.
No comments:
Post a Comment