अहीर गवली समाज अहिरात 

LightBlog

अहीर वर वधू परिचय मच

..
Showing posts with label हंसराज अहीर. Show all posts
Showing posts with label हंसराज अहीर. Show all posts

Tuesday, May 2, 2023

बल्लारशाह बायपास मार्गावरील अपघातग्रस्त दोन युवकांच्या**मदतीला हंसराज अहीर धावले.*

May 02, 2023 0
*बल्लारशाह बायपास मार्गावरील अपघातग्रस्त दोन युवकांच्या*
*मदतीला हंसराज अहीर धावले.*
*जखमींना ऑटोत बसवुन उपचाराकरीता पाठविल्यानंतरच अहीरांनी घटनास्थळ सोडले.*
चंद्रपूर - सर्वसामान्यांच्या सुखदुःखात सहभागी होवून त्यांना मदतीचा हात देणारे राजकारणी म्हणुन राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष तथा पूर्व केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांची विशेष ख्याती आहे. आज दि. 02 मे, 2023 रोजी त्यांच्या या लोकाभिमुख व्यक्तीमत्वाची व सर्वसामान्यांप्रती असलेल्या कळवळ्याची जाणीव प्रत्येक व्यक्तीला पुन्हा एकदा झाली आहे. राजुरा येथे दौऱ्यावर जात असतांना सकाळी 08:30 वाजता बल्लारशाह बायपास मार्गावर अपघात झाल्याने दोन युवक तडफडत असल्याचे अहीरांच्या दृष्टीस पडले त्यांनी आपले वाहन थांबवून रस्त्यावरील ऑटोव्दारे त्या जखमी युवकांना उपचारार्थ जिल्हा सामान्य रुग्णालयात भर्ती करण्यास रवाना केले त्यांच्यावर तातडीने उपचार करण्याच्या सुचना अधिष्ठाता व डॉ. जीवने यांच्याशी संपर्क साधून केल्या.
गंभीर जखमी असलेल्या अपघातग्रस्त एका युवकाची ओळख पटली असून त्याचे नाव अमित राजवंशी असल्याचे समजते दुसऱ्या युवकाचे नाव कळू शकले नाही. जखमी युवकावर उपचार सुरु असून त्याच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचे वैद्यकीय सूत्रांकडून कळते. जखमी युवकाच्या कुटूंबियांशी सुध्दा संपर्क साधण्यात आला. हंसराज अहीर अपघातस्थळी उतरल्याने नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली सोबतच्या सुरक्षा जवान व भाजप पदाधिकारी तसेच नागरिकांनी जखमीला ऑटोत बसविल्यानंतर हंसराज अहीर पुढच्या प्रवासासाठी रवाना झाले. त्यांच्या या लोकाभिमुख कार्याबद्दल उपस्थितांमध्ये प्रशंसा व्यक्त होतांना अनुभवास आली.

केंद्रीय राज्यमंत्री ना.रावसाहेब दानवे यांच्या हस्ते अध्यक्ष ब्रम्हानंद जांगडे व अहिर गवळी समाज नव

LightBlog