अहीर गवली समाज अहिरात 

LightBlog

अहीर वर वधू परिचय मच

..

Monday, August 3, 2020

मल्लसम्राट स्व.रुपा पहेलवान अहीर खरे

मल्लसम्राट स्व.रुपा पहेलवान अहीर खरे यांची शौर्य अमर गाथा



आज दि. 13 जुलै या दिवशी नामवंत आणि ज्येष्ठ थोर समाजसेवक कै.रुपा पहेलवान आहीर खरे यांच्या 24 व्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या जीवन कार्याचा परिचय देत आहोत.
देशातील महत्व मल्लसम्राट स्व.रुपा दुलीचंद खरे यंाचा जन्म महाराष्ट्रातील जालना जिल्ह्यातील एका साधारण कुटूंबात झाला होता. घरची परिस्थिती गरीब होती व कुटूंबातील सात भाऊ स्व.बेलीचंद पहेलवान खरे, स्व. कालुराम पहेलवान खरे, स्व.मोहन पहेलवान खरे, स्व.लक्ष्मण पहेलवान खरे, स्व.भोप्या पहेलवान खरे, स्व.रुपा पहेलवान खरे, स्व.बाबा पहेलवान खरे, नारायण पहेलवान खरे, स्व.शंकर कालुराम खरे, स्व.सुंदर बेलीचंदजी खरे आहे. सर्व सातही भाऊ मल्लविद्येत परिपूर्ण होते. तशी मल्लविद्या त्यांना वारसातच लाभली होती. लहानपणापासून ते खुप शारिरीक कसरत करायचे आणि आपल्या मोठ्‌या भावांकडून कुस्तीे धडे घ्यायचे. ते पहेलवानीच्या क्षेत्रात संपूर्ण भारतात आपले नाव गाजवायचे फार कमी वयात त्यांनी बीडचे अली चाऊस पहेलवान, औरंगाबादचे विष्णु पहेलवान गुजराती, अकोल्याचे मोहनसिंग टायगर असे मोठेमोठे पहेलवांना कुस्ती स्पर्धेत पराजित केले. जालना जिल्ह्याचे नाव महाराष्ट्रात नव्हेतर संपूर्ण भारतात लौकिक केले. त्यांचे भाचे हंसराजजी अहिर हे सुध्दा आज देशाचे केंद्रीय गृहराज्यमंत्री असून तेही स्व. रुपा पहेलवान खरे (मामा) यांच्या पदचिन्हावर चालत आहे. देशासाठी अहोरात्र सेवा करित आहे.
स्व. रुपा पहेलवान खरे यांची निवड कुस्ती स्पर्धेसाठी विदेशातही केली गेली; पण काही कारणामुळे त्यांचे विदेशात जाणे शक्य झाले नाही. पंजाब या राज्याचे कोच (गुरु) म्हणून त्यांची निवडही करण्यात आली होती. जालना शहरात राज्य राखीव पोलीस बल गट क्र.3 या पोलीस प्रशिक्षण केंद्रात व्यायाम शाळेचे गुरु (कोच) म्हणून राहीले आणि चांगले व श्रेष्ठ मल्ल तयार करुन मल्लविद्येची परंपरा जालना जिल्ह्यात कायम ठेवली.रुपा पहेलवान खरे हे महान मल्ल म्हणून गाजले. ते सर्वश्रेष्ठ पहेलवान होते आणि पहेलवानीच्या माध्यमातून त्यांनी गोरगरीबांची व शेतकऱ्यांची मदत करुन समाजसेवेचे एक चांगले उदाहरण देऊन जालना जिल्ह्यात जनतेमध्ये मानव एकतेचा संदेश दिला. जिल्ह्यातील जनतेमध्ये मानव एकतेचा संदेश दिला. जिल्ह्हयातील गावा-गावात जाऊन मल्लविद्येचा प्रसार करुन प्रत्येक गावात व्यायाम शाळा व तालीमची स्थापना केली. जिल्ह्यातील तरुणांमध्ये व्यसनमुक्ती व शरिर सौष्ठव ठेवण्यासाठी अभियानही राबविले. या कार्यात त्यांचे सहयोगी स्व.देवआण्णा पहेलवान (रुस्तमे हिंद), स्व. मुन्नु खलीफा (हनुमान व्यायाम शाळा), स्व.हुकूम पहेलवान खाकीवाले, भोप्या वस्ताद अखाडा, स्व.छोटम वस्ताद भगत, स्व. भिक्या वस्ताद भगत, स्व.रावसाहेब पहेलवान सुपारकर, स्व.लक्ष्मण पहेलवान खर्डेकर, गणेश पहेलवान मंडोरे, रमेश पहेलवान बागडी (रुपचंद वस्ताद तालीम), स्व.भावऱ्या पहेलवान बरवार, स्व. गणेश पहेलवान देवावाले (दादाराव वस्ताद तालीम), कुंदन पहेलवान, किशन पहेलवान कठोटीवाले, कैलास तालीम, नंदलाल पहेलवान भुरेवाल, नथ्थु पहेलवान भुरेवाले, ताराचंद पहेलवान कडपेवाले, स्व.डॉ.शामलाल गोरक्षक स्व.गंगाराम बटावाले, सिताराम बटावाले, गोकुल पहेलवान जटावाले, स्व. नारायण पहेलवान जटावाले, सईद पहेलवान चाऊस, बाबा पहेलवान खाकीवाले , पंडित पहेलवान (गोंदेगाव), रमजानी पहेलवान (राममुर्ती), मुक्तार पहेलवान (जालना), अमरसिंग पहेलवान (राजेवाडी), बाबु मामा सतकर, विठ्‌ठल पहेलवान अवघड, स्व.बाबा पहेलवान भगत, भिम पहेलवान खरे, स्व.पत्थर पहेलवान पवार, स्व. सांगलीकर पहेलवान, लखन पहेलवान, पप्पु पहेलवान, बाबुलाल बानीया, शिवराम खलीफा, राधेश्याम विजयसेनानी यांच्यासह जिल्ह्यात व देशात प्रचार प्रसार करुन जालना जिल्हयाचे नाव गाजविले.
तसेच सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक , क्रीडा व राजकीय क्षेत्रात ही त्यांनी अनेक शिष्य तयार करुन आज ते जालना जिल्ह्याचे राजकीय व सामाजिक कार्य चांगल्या प्रकारे संभाळत आहे. कोणावरही होत असलेल्या अन्यायावर आवाजा उठवून त्यांना न्याय मिळवून दिले. गोरगरीब व शेतकऱ्यांसाठी ते शक्तीशाली आधारस्तंभ होते. त्यांनी केलेले सत्कर्म व पुण्याई मुळे त्यांचे भारत देशात नावलौकिक व अजर अमर झाले. एकेकाळी गावातील गोरगरबी शेतकरी दुध विकत होते व शहरातील दुध विके्रत्याकडून दुधाचे खवा करुन त्यांची फसवणुक व आर्थिक शोषण करीत आहेत. त्यांच्या हक्कासाठी स्व.रुपा पहेलवान खरे यांनी शासन व प्रशासनाला निवेदने व मोर्चे व उपोषणे करुन न्याय मिळवून दिले. तेव्हा पासून दुधाचे फाईट पध्दत सुरु करुन शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिला. स्व. रुपा पहेलवान खरे यांना राजकीय षडीयंत्रामुळे रासुका प्रकरणात अटकून त्यांची प्रतिमा ठेस पोहचविण्याचे प्रयत्न केले. त्याच वेळेस जालना जिल्ह्यातील त्यांच्या प्रियजणांनी तीन ते चार दिवस जालना बंद पुकारण्यात आला होता. बी.बी.सी. न्युज प्रसार माध्यमाने वृत्ताची दखल घेतली. पंतप्रधान स्व. इंदिरा गांधी यांनी वृत्ताची दखल घेऊन त्यांच्या सहकार्याना विचारले की औरंगाबाद जिल्ह्यातील जालना तालुक्यातील स्व.रुपा पहेलवान खरे हे व्यक्ती कोण आहे ? जालना तालुक्याचे नाव तेव्हा देश पातळीवर गाजविले, मानवतावादी होते, सामाजिक एैक्याचे खंदे समर्थक होते. ते नेहमी फुटीरवादी लोकांच्या विरोधात राहीले. त्यांनी सामाजिक ऐक्यासाठी प्रयत्न केले. त्यांच्या जीवनकाळात खुस्तीच्या स्पर्धा व दंगली, मैदानी स्पर्धा, रक्तदान शिबीरे, अन्नदान -भंडारा असे सामाजिक व सांस्कृतिक उपक्रम राबविले. जालना गणेश महासंघाचे संस्थापक अध्यक्ष ही होते. शहरातील होळी महोत्सव, हात्ती रिसाळा ही परंपरा त्यांनी प्रोत्साहन दिले. जिल्ह्यातील शांतता कमीटी व सर्वधर्म समभाव समितीचे सदस्य होते.


जिल्ह्यातील लोकांच्या आग्राहास्तव त्यांनी जालना विधानसभा 1985 साली लढली. जिल्ह्यातील एकमेव नावलौकीक व श्रेष्ठ असल्याने समाजकंठाकानी कटकारस्थाने रचली पण ते अपयशी झाले. त्यांचे मुले राजु खरे, संजय खरे, परंपरेनुसार स्व.रुपा पहेलवान खरे सांस्कृतिक क्रीडा मंडळ संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुनिल खरे हे सामाजिक, राजकीय व क्रीडाक्षेत्रात सक्रीय आहे.

आपला

सुनिल रुपा पहेलवान अहीर खरे
मो. 976235111

No comments:

Post a Comment

केंद्रीय राज्यमंत्री ना.रावसाहेब दानवे यांच्या हस्ते अध्यक्ष ब्रम्हानंद जांगडे व अहिर गवळी समाज नव

LightBlog