अहीर गवली समाज अहिरात 

LightBlog

अहीर वर वधू परिचय मच

..

Wednesday, December 13, 2023

स्व.रुपा पहेलवान खरे चौकाचे भव्य उद्‌घाटन स्व.रुपा पहेलवान खरे असे मल्ल व असे चौक आजपर्यंत पाहिले नाही-दिनानाथ सिंह हिंदकेसरी

हिंदकेसरी दिनानाथ सिंह यांच्या हस्ते 
स्व.रुपा पहेलवान खरे चौकाचे भव्य उद्‌घाटन 
स्व.रुपा पहेलवान खरे असे मल्ल व असे चौक आजपर्यंत पाहिले नाही-दिनानाथ सिंह
जालना-प्रतिनिधी
येथील प्रसिध्द मल्लसम्राट स्वर्गिय रुपा पहेलवान खरे चौकाचे सुशोभिकरण करण्यात आले असून, त्याचा लोकार्पण सोहळा आज रविवारी (दि. 3) सकाळी  11 वाजता कडबी मंडी, सिंधी बाजार जालना येथे संपन्न झाले. यावेळी राजकीय नेते, सामाजिक कार्यकर्ते, व्यापारी, पहेलवान मंडळी, शहरवासिया यांची मोठ्या संख्येने उपस्थित होती.
*या कार्यक्रमाचे उद्‌घाटक हिंद केसरी पहेलवान दिनानाथ सिंह, कार्यक्रमाचे अध्यक्ष आमदार कैलास गोरंट्याल, विशेष अतिथी म्हणून शिवसेना जिल्हाप्रमुख भास्कर आंबेकर, भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष भास्कर दानवे, माजी आमदार संतोष सांबरे, घनश्याम गोयल, नारायण चाळगे, छत्रपती संभाजीनगरचे माजी महापौर अशोक सायन्ना, महाराष्ट्र गवळी समाजासचे प्रदेशाध्यक्ष हिरामनआप्पा गवळी, राहुल अग्रवाल, भाजपाचे जिल्हाध्यक्ष बद्री पठाडे, रामेश्वर भांदरगे, भाजपाचे नगरसेवक महेश निकम, ज्ञानेश्वर ढोंबळे, अर्जुन गेही, कन्हैय्या वस्ताद भगत, लक्ष्मणआप्पा सुपारकर, गणेश राऊत, नंदकिशोर जांगडे, विजय चौधरी, पारस नंद, अतिक खान, नंदलाल जटावाले, रमेश जोशी, संजय मिसाळ आदींची उपस्थिती होती. तसेच विशेष सत्कारमुर्ती उप महाराष्ट्र केसरी भरत पहेवालन मेकाले, जिल्हा मध्यवर्ती बॅंकेचे संचालक रितेश कामड, महाराष्ट्र केसरी स्पर्धेत कास्यपदक मिळविले पवन बावणे, अविनाश नावकर यांचा सत्कार करण्यात आला*
*या कार्यक्रमाचे सुरुवात वैदमंत्र उच्चाराने दिपप्रज्वलीत करुन भगवान श्रीकृष्णाच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन बजरंग बली की जय या घोष वाक्याने सुरुवात करण्यात आली. यावेळी आमदार कैलास गोरंट्याल यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना माझे* *सहयोगी सांगली येथील आमदार संभाजी जाधव यांनी मला विचारले कि तु कुठन आहे त्यावेळी मी सांगितले की जालना येथून निवडून आले आहे. त्यावेळी आमदार संभाजी जाधव यांनी त्यांना सांगितले की रुपा पहेलवान यांचे जालना शहर का ? व तसेच रुपा पहेलवान खरे यांची विचारपूस केली. त्यानंतर शिवसेना जिल्हाप्रमुख भास्कर आंबेकर यांचे मनोगत व्यक्त करतांना सांगितले वर्तमान राजकीय मंडळीत आम्ही सर्व मातीचे भांडे असून आम्हाला घडविणारे स्व.रुपा पहेलवान खरे हे होते. छत्रपती संभाजीनगर येथील माजी महापौर अशोक सायन्ना यांनी सांगितले की, जालना शहरात शासनामार्फत एक नविन क्रीडा संकुल उभारुन त्या क्रीडा संकुलनास स्व.रुपा पहेलवान खरे यांचे नाव देण्यात यावे जालनेकरांच्या वतीने हीच त्यांना खरी श्रध्दांजली राहील व त्याप्रमाणे दहा वर्षापासून शंकरपट्‌टाचे लढा चालला होता त्यास न्यायालयाने मान्यता दिली*. *त्याचप्रमाणे स्व.रुपा पहेलवान यांचे छंद रेड्‌यांची टक्कर या खेळालाही मान्यता देण्यात यावी अशी मागणी यावेळी केली. हिंद केसरी दिनानाथ सिंह यांनी सांगितले की, जेव्हा मी प्रथमच महाराष्ट्र केसरी झालो त्यावेळेस स्व. रुपा पहेलवान खरे यांनी मला भरपूर सहकार्य केले. तसेच जिवनात आजपर्यंत स्व. रुपा पहेलवान खरे यांच्या सारखे मल्ल पाहिले नाही व पहेलवानच्या नावे प्रथमच असे सुंदर चौक पहिले*.
*या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून अशोक अण्णा पांगारकर,राजेश राऊत, रमेश गौरक्षक , हरेश देवावाले,  कपील भुरेवाल,सुबोध विजयसेनानी, चंपालाल भगत, दिपक भुरेवाल, ऍड.विजय करंडे, हेमराज पै.भुरेवाल, ऍड.पियुश गौरक्षक, डॉ. पंडीत सर, डॉ.शिवशंकर उफाड, गोकुल उफाड, इंदरचंद तवरालाला, डॉ.शिवदत्त विजयसेनानी, संजय भगत, जनार्धन खोतकर, दिनेश भगत, जगदीश भरतीया, शिवप्रकाश चितळकर, विनोद यादव, बाबुमामा सतकर, तुलसीराम फत्तेलष्करी, अनिल भुरेवाल, अनिल भगत, विनोद सिनगारे, राजु माधोवाले, गणेश सुपारकर, प्रशांत वाढेकर, विजय बानीया, नंदबाबा सतीकर, शिव वस्ताद भगत, पै. बबन काजळे, पै. मोहन परिवाले, पै. कुंदन कठोडीवाले,बबनलाल भगत, मदनलाल नारियल वाले, धनूलाल  भगत ,दिपक जागङे, पै. माधव राऊत, पै.जयचंद भुरेवाल, पै.श्रीराम धानुरे, पै.कमल खान, पै.उमेश विजयसेनानी, पै.गणेश बटावाले, पै. उमेश खाकीवाले, पै. अन्वर पठाण, पै. बुठण कुरेशी, पै. हरिचंद नंद, पै. देवि भगत, पै.ताराचंद झाडीवाले, पै.अफसर, जय सुरा, संतोष आर्य, राधेश्याम विजयसेनानी, मदन वस्ताद भगत, प्रभुलाल गोमतीवाले, शशिकांत घुगे, नंदुआप्पा परळकर, नारायणआप्पा काटकर, रतिलाल भगत, सचिन कापसे, महेश दुसाने, रोशन चौधरी, इंजि.गोपाल भुरेवाल, सतिष वाहुळे, विजय लहाने, अशोक लोंढे, अर्जुनलाल भगत, राजु भुरालाल भगत, शांतीलाल झुंगे, धनराज काबलीये, बद्री भुरेवाल, गणेश धुलधानी, तिलक धुलधानी, स्वराज यादव,मदन भुरेवाल, शिवराज नारियवाले, धन्नु झाडीवाले, जिवन सले, संतोष भगत, गंगाभिष गौरक्षक, प्रकाशसिंह राजपूत, नारायण गोमतीवाले, दिनेश चौधरी, कैलास खराटे, नरेंद्र जांगडे, संतोष मोहिते पाटील, गोटुराम कापसे, शेख नसीर, अक्षय पवार, भैय्यालाल कडपे, अनिल रामलाल भगत, भरत सांबरे, बाला परदेशी, पै.अमोल धानुरे, पै.बालाजी एलगुंदे, रामकुमार भुरेवाल, पै.शरद भालेराव, कैलास मघावाले, तुलजेश चौधरी, पै.गोपाल जटावाले (जालना केसरी), योगेश देवावाले, सुरेश सद्‌गुरे, दिनेश नंद, गोपाल गोमतीवाले, रोहित, संतोष माधोवाले, कपिल चोधरी, राजेश काबले, राजु जैन, नीतिन मेघावाले, भुरेवाल, मदन जटावाले, गंगालाल भुरेवाल, मदन नंदवंशी, कुमार अण्णा, अमरसिंह राजपूत, सुंदर खरे, धनराज खरे, चेतन जटावाले, प्रमोद गंडाळ, गिरीष देशपांडे आदींची उपस्थिती होती*.
*या कार्यक्रमास यशस्वी करण्यासाठी संजय खरे, राहुल यादव, विशाल उफाड, सुरेश कालीवाले, कपील खरे, पंकज खरे, कमलेश खरे, दुर्गेश खरे, नितीन खरे, राजकुमार खरे, अमर झाडीलवाले, किशोर भुरेवाल, नारायण भगत, कन्नु गोमतीवाले, बबलु नंद, पवन खरे, चेतन खरे, लक्ष्मण ईधाटे, सेवक नारियलवाले, सोमेश काबलीये, नरेंद्र भगत, सोनु नंद, गणेश गोमतीवाले, संदीप बटावाले, कुंदन गोमतीवाले, नितीन भगत, शाम बनछोड, मदन गोमतीवाले, गब्या बनछोड, मनज्या राजपूत, हरेश भगत, कार्तीक परिवाले, भुष नंद, शाम जाधव, विजय शिंदे, हरेष भुरेवाल, आकाश देशमाने, कपील गोन्टे पा., जय चौंडीये, अमन जैस्वाल, अजय रोडीये, गोपाल बानीया, आकाश चौधरी, दिपक चाचु , मयुर खरे, अशोक विजयसेनानी, आकाशखरे, दीपक बटावाले, दत्ता पाटील, धीरज भगत, सुरेश खाकीवाले, रोहीत भगत, राहुल भगत, आकाश भगत, आदींनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन पै.शदर भालेराव व मनिष नंद यांनी केले तर आभारप्रदर्शन कार्यक्रमाचे आयोजक सुनिल रुपा पहेलवान खरे यांनी मानले*.

       आपला विश्वासून

   सुनिल रुपा पहेलवान खरे
        सचिव : स्व.रुपा पहेलवान खरे सांस्कृतिक

No comments:

Post a Comment

केंद्रीय राज्यमंत्री ना.रावसाहेब दानवे यांच्या हस्ते अध्यक्ष ब्रम्हानंद जांगडे व अहिर गवळी समाज नव

LightBlog